स्टार हेल्थ इन्शुरन्स मराठी माहिती Star Health Insurance Information in Marathi

                                               स्टार हेल्थ इन्शुरन्स                                         


स्टार हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?

            स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही आरोग्य विमा क्षेत्रातील पहिली Stand Alone Health Insurance कंपनी आहे. ह्या कंपनीची स्थापना 2006 मध्ये झाली. ही कंपनी कमी कालावधीत आघाडीची कंपनी म्हणून पसरली आहे. जी ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य विमा उत्पादनांची विविध श्रेणी प्रदान करते. इतर कंपनीच्या तुलनेत स्टार हेल्थ स्वस्त आरोग्य विमा योजना देण्यात अतिशय लोकप्रिय आहे. कंपनीचे देशभरात 14500+ हुन अधिक नेटवर्क हॉस्पिटल आहेत. तसेच 800+ हुन अधिक ब्रँच ऑफिसेस आहेत. व 6 लाख प्रतिनिधी आहेत { LIC नंतर सर्वात जास्त आरोग्य विमा प्रतिनिधी असलेली एकमेव कंपनी आहे.} त्यामुळे ते मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचते .

स्टार हेल्थ इन्शुरन्स का घ्यायचा? याचे काही फायदे 

1. अंदाजे दाव्यांचे प्रमाण - Claim Settlement Ratio.

            IRDA ने निर्देशित केल्यानुसार हे प्रमाण 60% ते 100% दरम्याने असावे. जेव्हा आपण स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या पूर्ण क्लेम सेटमेंट रेशो बद्दल बोलतो. तेव्हा तो 99.06% इतका आहे.

2. ग्राहक समाधान - Customer Satisfaction

            स्टार हेल्थ कंपनीचे ग्राहक समाधानी ग्राहक असल्याने ते कंपनीच्या वाढीमसाठी अविभाज्य भूमिका निभवाताना  दिसतात. कंपनीने आतापर्यंत 8.4 कोटी दावे दिलेल आहेत. म्हणजे एकूण 35000 कोटी रुपयाचे दावे दिलेले आहेत. कल्पना करा,   की किती कुटुंबाना आर्थिक फायदा झाला असेल आणि दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ मिळाला असेल. त्यामुळे स्टार हेल्थ आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

3. Quick and Smooth Claim Service -

            स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे Claim Settlement 90% पेक्षा जास्त कॅशलेस क्लेम 2 तासाच्या आत  निकाली काढतात. यामुळे कस्टमर केअर सर्व्हिस किती कार्यरत आहे हे दर्शविते, चालू आर्थिक वर्षात 8 लाख दावे अतिशय सहजतेने कोणत्याही अडचणीशिवाय निकाली काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे समाधान सुनिश्चित झाले आहे.

4. Award and Title - 

            स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी भारतातील नं 1 ची रिटेल  विक्रीसाठी मान्यताप्राप्त कंपनी म्हणून नावाजलेली आहे. 

5. Cashless Treatment - 

            स्टार हेल्थ इन्शुरन्स नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस हॉस्पिटायझेशन सुविधा मिळवण्याची एक प्रक्रिया आहे . स्टार हेल्थ इन्शुरन्सचे 14500 + हून अधिक रुग्णालयांचे देशात नेटवर्क आहे. जेथे ग्राहक कॅशलेस हॉस्पिटलायझेशनचा लाभ घेऊ शकतात.  त्याचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. 

आवश्यक कागदपत्रे - 

 • जसे की पॉलिसी Number / Id Card,  डॉक्टरांचे सल्लापत्र, प्रिस्क्रीप्शन.  हॉस्पिटलच्या claim पाहणाच्या व्यक्तीकडे submit  करावे लागते . 
 • claim पाहणारी हॉस्पिटल मधील व्यक्ती  स्टार हेल्थच्या वेबसाईटवर फॉर्म भरून, कागदपत्रांची पडताळणी आणि authorization (अधिकृतता ) करतील.
 • एकदा स्टार हेल्थ इन्शुरन्सने संबमिट केलेल्या कागदपत्रांना अधिकृत केले की, डिस्चार्जच्या  वेळी थेट हॉस्पिटल मधून दावा claim निकाली  काढला जाईल.
6. Lifelong Renewal - आजिवन  नूतनीकरण 

            स्टार हेल्थ ग्राहकांना कमी प्रयत्नात पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण करण्याची सोय आणि सुविधा देते. व पॉलिसीधारकास आधीच्या पॉलिसी वर्षात मिळालेले सर्व फायदे सोबत घेऊन पॉलिसीचे नूतनीकरण करण्यास पर्याय उपलब्ध करते. 


CHECK THE PRICE

प्रतिपूर्ती दावा सेट्लमेंट प्रक्रिया - Reimbursement 
 • नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास दाव्यांची परतफेड लागू होते. 
 • हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत claim intimation देणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपनीच्या टोल फ्री नंबर वर कॉल करून ,mail  द्वारे, what's up नंबर द्वारे claim intimation देण्याची सुविधा कंपनीने करून ठेवलेली आहे. 
 • डिस्चार्ज झाल्यानंतर विमाधारकाने सर्व बिले, फार्मसी बिले  म्हणजे ज्या आजारासाठी admit झाले होते, ती सर्व कागदपत्रे आणि त्यावर झालेला सर्व खर्च संकलित करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांचे पुरावे स्टार हेल्थ इन्शुरन्सकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर, पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून दावा निकाली काढण्याची प्रक्रिया केली जाईल.

दाव्याच्या प्रतिपूर्तीसाठी कागदपत्रांची यादी  -
 • संपूर्णपणे भरलेला क्लेम form B हा हॉस्पिटलमधून भरून घेणे व claim form A स्वतः भरणे. 
 • हॉस्पिटलमध्ये 15 बेड पेक्षा कमी बेड असल्यास, हॉस्पिटल नोंदणी प्रमाणपत्र संबमिट करणे. 
 • केमिस्टची मूळ बिले, योग्य प्रिस्क्रीप्शनद्वारे सहित जमा करणे.  
 • पॅथॉलॉजिस्टकडून मिळालेली पावती आणि तपासणी चाचणी अहवाल. चाचणीसाठी उपस्थित डॉक्टरांकडून वैद्यकीय व्यवसायी / सर्जन यांनी नमूद केलेल्या नोट द्वारे ऑपरेशनचे स्वरूप आणि सर्जनचे बिल आणि पावती जमा करणे.
 • अपघाती प्रकरण असेल तर स्वयंघोषणापत्र / एम एल सी / प्रथम माहिती  अहवाल व उपस्थित डॉक्टरांचे प्रमाणपत्र येणे. 
                मित्रांनो, आज आपण स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी बद्दल काही मुद्द्यावर लेख वाचला. असेच काही मुद्द्यावर आपण या ब्लॉग वर पुढेही चर्चा करणार आहोत. जसे सर्व उत्पादनांवर, प्रश्नांवर. 
तर मित्रांनो ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.


PURCHASE YOUR BEST DIET

https://www.amway.in/all-plant-protein-powder/p/313482ID?an=rRf4fDUPgEG0wbU-

PURCHASE YOUR BEST HEALTH INSURANCE

 https://youtube.com/@shivajilohar7

SAVE ON FACEBOOK     

https://www.facebook.com/profile.php?id=100083307488731&mibextid=ZbWKw

FOLLOW IN INSTAGRAM

https://instagram.com/shivaji.lohar.3958?igshid=ZDdkNTZiNTM=
टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरोग्य विमा का महत्वाचा ?

आरोग्य - विम्याची कार्यपद्धती