टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स {Top Up Health Insurance }
टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स
मित्रांनो आपण जर मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला टॉप - अप प्लॅन समजायला सोपा जाईल. समजा तुम्ही आपल्या मोबाईल नंबरवर 100 रुपयांचे रिचार्ज केले आहे. यामध्ये आपल्याला 85 रुपये बोलण्यासाठी मिळालेले आहेत. व त्याचा अवधी ३० दिवसाचा आहे. आणि जर आपला बॅलेन्स45 रुपये 30 दिवसाच्या आत संपला असेल तर, अशा स्थितीत आपण अधिक रुपयांचा टॉकटाईम किंवा टॉप - अप प्लॅन घेऊ शकतो. दोन्ही स्थितीत आपल्याला अधिक बॅलेन्स मिळतो. या सारखेच टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असतो. ज्यामध्ये आपली मुळ विमा रक्कम संपली असल्यास टॉप - अप प्लॅनचा उपयोग करता येतो.
टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स
म्हणजे काय?
टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स एक ॲड ऑन कवर असलेली पॉलिसी आहे. जी मेडिकल इमर्जन्सी मध्ये आपल्याला व आपल्या कुटुंबासाठी अधिक सुरक्षितता देते.
टॉप - अप प्लॅन काम कसा करतो?
समजा आपण एक आरोग्य विमा पॉलिसी घेतलेली आहे. व
त्याची विमा रक्कम 5 लाख रुपये आहे. आणि
आपल्याला जर इमर्जन्सी मेडिकल खर्च येतो व आपण घेतलेल्या विमा रकमेपेक्षा [5 लाखापेक्षा] जास्त खर्च येत असेल, तर अशा अवस्थेत टॉप - अप प्लॅन आपली मदत करतो. म्हणजे मुळ विमा रकमेपेक्षा जास्त खर्च आला असेल व आपण टॉप - अप घेऊन ठेवला असेल तर वरील खर्च टॉप - अप प्लॅन मधून दिला जातो. फक्त एवढेच हि सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला टॉप - अप प्लॅन आपल्या मुळ विमा पॉलिसी
सोबत घेणे किंवा लवकरात लवकर घेऊन ठेवणे आवश्यक असते. कारण क्लेम आल्यावर टॉप - अप हेल्थ इन्शुरन्स करता येत नाही.
तुलना करून पाहणे
जस आपण टॉप - अप प्लॅन संदर्भात
चर्चा केली. त्याप्रमाणे आपण टॉप - अप प्लॅन तुमचा जिथे रेगुलर हेल्थ इन्शुरन्स आहे.
त्याच कंपनीचा करू शकता. किंवा इतर कोणत्याही कंपनीचा टॉप - अप इन्शुरन्स घेऊ शकता टॉप - अप प्लॅन घेताना
दोन चार कंपन्याचे टॉप - अप प्लॅन कंपायर करून पहा. यामुळे
तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या प्लॅनची माहिती मिळेल व योग्य वाटेल तो टॉप - अप प्लॅन खरेदी
करा.
विश्वासाहर्ता पडताळून
पहा
टॉप - अप प्लॅन घेताना कंपनीची
विश्वासहर्ता तपासून पहा यासाठी ग्राहकांचे रिव्हू चेक करा. आपल्या ओळखीच्या
ग्राहकाचा क्लेम झालेला असतो. त्याला भेटून त्याच्यासोबत चर्चा करून कंपनीच्या
सुविधा आणि सर्व्हीस बद्दल माहिती करून घ्या. क्लेम सेंटमेंट रेशो तपासून पहा.
योग्य माहिती देण.
रेगुलर हेल्थ इन्शुरन्स असो किंवा टॉप - अप हेल्थ
इन्शुरन्स कंपनीला विमा घेते वेळी आपल्या आरोग्य संदर्भात योग्य माहिती देणे
गरजेचे आहे. कारण मेडिकल कंडीशन लपवून ठेवल्यास कागदपत्रांची उलट - पालट तपासणी
झाल्यास इन्शुरन्स कंपनी आपला क्लेम रिजेक्ट करू शकते.
टॉप - अप प्लॅनची काही
वैशिष्ठ्ये
1. टॉप - अप प्लॅन आपल्या सोयीनुसार बेसिक प्लानमध्ये बदलता येतो.
2. हॉस्पिटलमध्ये भर्ती
झाल्यानंतर डॉक्टरची फी, रूमचे भाडे यासाठी कोणतेही लिमिट नाही राहत.
3. पॉलिसी बद्दल चांगल्या
प्रकारे माहिती, नियम व अटी समजून
घेण्यासाठी पुढील काही दिवसासाठी फ्री लुक परियड दिला जातो. प्री लुक परियड अशी एक
विशेष वेळ आहे. ह्या दिवसांत आपल्या पॉलिसी नको असल्यास [Return] करू शकतो
4. पॉलिसीची टर्म 1 वर्ष किंवा 2 वर्ष असू शकते. यात बदल पण होऊ शकतो कारण हे विमा कंपनीवर अवलंबून
आहे.
टॉप - अप प्लॅनचे वैशिष्ठ्ये
आपल्याला हि पॉलिसी घ्यायची असल्यास व्यक्तिगत
अथवा कुटुंबासाठी घेता येते. प्लोटर प्लॅन मध्ये कुटुंबाच्या सदस्यांना वेगवेगळी
पॉलिसी घ्यायची आवश्यकता भासत नाही, एकाच पॉलिसीमध्ये सर्व सदस्य कवर होतात. विमा रक्कम सुद्धा सर्वांना
एकच असते. वैशिष्ठ्ये म्हणजे परिवारातील एक जरी सदस्य हॉस्पिटलायज झाल्या असल्यास
पूर्ण विमा रक्कम खर्च करू शकतो. म्हणजे 1 करोड विमा रक्कम असल्यास कुटुंबातील एक व्यक्ती किंवा सर्व व्यक्ती
पूर्ण विमा रक्कम वापरू शकतात.
पहिल्यापासून अस्तित्वात
असलेल्या आजारांसाठी हेल्थ कवर
खर तर काही कंपन्या पहिल्यापासून अस्तित्वात
असलेल्या आजारांसाठी कवरेज देत नाहीत. एक चांगल्या हेल्थ इन्शुरन्स सोबत टॉप - अप प्लॅन घेऊ
शकता. म्हणजे तुम्हाला आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना पण कवर करता येईल
टॉप - अप प्लॅन
कोणी खरेदी केला पाहिजे?
सिनिअर सिटीजन - जस - जस आपल वय वाढत जात तस - तसे आपल्या हेल्थ विषयी तक्रारी वाढत जातात / सुरु होतात. काही वेळा हेल्थ विषयी समस्या एवढ्या त्या मॅनेज करणे कठीण होऊन बसते. आणि आपल्या कडे असलेला हेल्थ इन्शुरन्स पुरेसा पडत नाही. आणि आपल्याकडे असलेल्या विम्यापेक्षा जास्त बिल आल्यास ते बिल आपल्या खिशातून भरावे लागते. अशा वेळेस जर टॉप - अप आपण घेऊन ठेवला असेल तर आपल्या खिशातून जाणारा पैसा वाचू शकतो
कार्पोरेट - कर्मचारी विमा
कार्पोरेट कंपनीमध्ये काम करत असताना जिथे आपण काम करत असतो. ती कंपनी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स देते. पण तो हेल्थ इन्शुरन्स पुरेसा असेलच असे नाही. व कंपनी चेंज केल्यास तो विमा कंटिन्यू होईलच असे नाही. अशा वेळेस आपण विचार करू शकता. जो मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपल्या व आपल्या परिवाराची सुरक्षा करू शकतो.
कमी विमा राशी
भारतात कमी इन्कम असलेल्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. अशा अवस्थेत हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी त्यांच्याकडे योग्य बजेट नसते. अशा वेळेस कमी हप्ता असलेल्या विमा पॉलिसी घेण्याचे प्रमाण वाढते. त्यांना हेसुद्धा माहिती असते. कि हा विमा आपल्याला काही रकमेपर्यंत मदत करू शकतो. अशा वेळेस टॉप - अप प्लॅन घेण्यासाठी विचार करणे खूप गरजेचे आहे. टॉप - अप प्लॅन कमी पैशात कवरेज देतो.
तर मित्रांनो आजच आपला टॉप - अप प्लॅन घेऊन ठेवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा