Sum Insured in (Marathi)
Sum Insured in (Marathi) हेल्थ - इन्शुरन्समध्ये विमा रकमेचे महत्व (Sum Insured) नेहमी आरोग्य - विमा पॉलिसी घेताना काही असे शब्द असतात. जे ऐकताना सोपे व समजताना फार कठीण असतात. अशात आपलि दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या शब्दांचा योग्य अर्थ माहित करून घेणे खूप महत्त्वाचे असते. हेल्थ इन्शुरन्स विकत घेत असताना सर्व घटकांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सम इनश्योर्ड (Sum Insured) विमा रक्कम याबद्दल योग्य निर्णय घेणे. यांच्या आधारे आपला प्रिमियम ठरवला जातो . या लेखात आपण पाहणार आहोत कि, आपल्याला किती विमा रक्कम पुरेशी आहे. व जास्त विमा रकमेचा विमा घेतल्यास किंवा कमी रकमेचा विमा घेतल्यास त्याचे काय फायदे आणि तोटे होऊ शकतात. विमा रक्कम म्हणजे काय ? पॉलिसीधारकाला त्याच्या विमा कंपनीने देय केलेली रिस्क कवर म्हणजे विमा रक्कम. म्हणजेच sum insured म्हटले जाईल. जेव्हा कधी हॉस्पिटलाईज व्हायची वेळ येते. त्यावेळी पॉलिसी धारकाला पॉलिसीमध्ये देय केलेली विमा रक्कम क...