आरोग्य - विम्याची कार्यपद्धती
आरोग्य - विम्याची कार्यपद्धती
आपण आरोग्यविम्याच्या कार्यपद्धतीचा जर विचार केला तर आरोग्यविम्याचे काही पॅरॅमिटर्स आरोग्य विमा विक्री करणाऱ्या सर्व कंपन्यानी तयार केलेले आहेत. काही वर्षाच्या प्रदिर्घ अभ्यासानंतर हे काही पॅरॅमिटर्स तयार केलेले आहेत.
काही लोकांच्या लक्षात येत नाही की, आरोग्य विम्याची संरचना, कार्यपद्धती काय आहे, सांगायचे झाले तर आरोग्य विमा हा एक व्यवसाय आहे. विमा कंपनीकडे किंवा सरकारकडे पैसे खूप जास्त झाले आहेत. आणि ते वाटायला बसले आहेत. असा विचार कोणीही करू नये. एखादा-दूसरा खोटा क्लेम जमा केला तर काय फरक पडणार आहे. तो एखाद्या मोठ्या रचनेत खपून जाईल. असे समजू नये. आरोग्य- विम्याची कार्यपद्धती ही सहकारावर अवलंबून असते.
उदा -
समजा एका शहरात 36 ते 45 वयोगटातील 10,000 व्यक्तिनी मेडीक्लेम पॉलिसी घेतली आहे. असे गेली 10 वर्ष पॉलिसी नूतनीकरण करताहेत. दरवर्षी यातील 250 व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. या सर्वांचा एकूण येणार खर्च 2500000/- एवढा आहे. याचा अर्थ 10000 व्यक्तींना दरवर्षी सरासरी खर्च रु 250/- (2500000/10000) इतकाच आलेला आहे. म्हणजे 10000 जणांच्या या समूहाने प्रत्येकी फक्त 250/- इतकी रक्कम भरून आपल्या समूहाचा एकूण 2500000/- रुपयांचा बोजा उचलेला आहे. यामध्ये फक्त 250 लोकांना फायदा मिळाला मात्र 9750 व्यक्तींनी हा भार वाटून घेतला आहे. आता असा प्रश्न उपस्थित होईल की 9750 लोकांचे 250 रुपये वाया गेले, तस नाही होत मित्रांनो, मी विमा काढला की त्यातून मला काहीतरी फायदा मिळालाच पाहिजे हे आधी डोक्यातून काढून टाकणे गरजेचे आहे. आपण एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे की, विमा एक जोखीम व्यवस्थापनाची व्यवस्था आहे. उदहरणाप्रमाणे दरवर्षी 250 लोकांना हॉस्पिटलाईज करावे लागते पण 10000 व्यक्तींपैकी कोणत्या 250 लोकांना यावर्षी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल हे सांगता येत नाही. दहा हजारापैकी कोणत्याही व्यक्तीवर कधीही आणि केव्हाही ही पाळी येऊ शकते. हे लक्षात घेतले पाहिजे. 10000 व्यक्तिपैकी प्रत्येक व्यक्ती एक अदृश जोखीम स्वतः बरोबर घेऊन वावरत आहे की , मला यावर्षी कदाचित हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. व त्याने भरलेले 250 रुपये ही त्या जोखमीची किंमत आहे.
आपण भरपूर रकमेचा आरोग्य विमा घेतला आहे. आता मस्तपैकी आजारी पडावे. कोणतातरी असाह्य रोग व्हावा, अपघात व्हावा, आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे असे कोणालाही मनापासून वाटत नसते. याउलट मी कधीही आजारी पडू नये आणि हॉस्पिटलमध्ये कधीही दाखल व्हायची पाळी माझ्यावर येऊ नये असेच प्रत्येकाला वाटते, आरोग्य विम्याचा फायदा घ्यायची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये अशी प्रार्थना परमेश्वराकडे, केली पाहिजे.
मित्रांनो,
आपण आरोग्यविम्याची कार्यपद्धती नीट समजून घेतली तर आपण योग्य आरोग्य विमा खरेदी करू शकतो, यात काहीच शंका नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, शरीररचना, अवयवांची कार्यक्षमता वेगवेगळ्या असतात. त्याच बरोबर राहिणीमान, कामाचे ठिकाण, तेथील वातावरण आनुवंशिकता या सर्व गोष्टी त्याच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. तसेच व्यक्तींच्या सवयी, व्यसणे, त्यांचा स्वभाव, जीवनपद्धती याही काही महत्वाच्या असतात. अशावेळी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करून त्या सर्व पैलूचे प्रमाणीकरण करून, सुसूत्रीकरण करून. एका साच्यामध्ये बांधणे खरोखरच अवघड काम आहे. यासाठी वैद्यकीय आणि विमा क्षेत्रातील तज्ञांनी एकत्र बसून खूप प्रयत्नानी आरोग्य विम्याची कार्यपद्धती ठरविलेली आहे. आपण आरोग्य विमा घेताना त्याचा प्रपोजल फॉर्म वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की, किती प्रकारांनी पॉलिसीधारकाच्या प्रकृतीचा आणि त्यावरील जोखमींचा अभ्यास केला आहे. याचे कारण असे की व्यक्ति स्वतः आरोग्य विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन भेट देऊ शकत नाही तसेच आरोग्य विमा घेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी आवश्यक नसते. याशिवाय आता आरोग्य विमा घेण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करावी लागत नाही. प्रपोजल फॉर्म मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक आली तर कोणतीही तपासणी न करता आरोग्य विमा दिला जाऊ शकतो. पण काही शंका आल्यास सर्व प्रकरांच्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. त्यानंतर कंपनी ठरविते की, आरोग्य विमा द्यायचा की नाही ते. जर पॉलिसी घेण्यापूर्वी काही आजार असेल, ज्याची ट्रीटमेंट चालू आहे किंवा झालेली आहे. आशा प्रिएक्झिस्टिंग आजारणासाठी कंपनीच्या नियमाप्रमाणे काही वर्ष त्या आजारासंबंधात दाव्या देण्यास येत नाही.
उदा -
रक्तदाब, मधुमेह असे आजार पॉलिसी घेण्यापूर्वीपासून असतील तर अशा आजारांना व त्यासंदर्भात निर्माण होण्याऱ्या आजारांसाठी कंपनी काही वर्ष क्लेम देत नाही.
पॉलिसी धारकाला पॉलिसी देण्यामध्ये किती जोखीम आहे. त्यासाठी अंडरराइटीनगची विविध तंत्रे वापरली जातात. एका ही गोष्टीत शंका आली तर त्याची शहानिशा करण्यासाठी त्या शक्यतेचा सखोल शोध घेतात.
सदृढ आणि आजारी पडू न शकणाऱ्या व्यक्तीचा समहू बनविणे त्यांना आरोग्यविम्याच्या छत्राखाली एकत्र आणणे आणि त्यांच्यासाठी क्लेम देण्याची पाळी येऊ न देणे यात आरोग्यविमा कंपनीच्या व्यवसायाचे यशाचे गणित सामावलेले असते. त्यामुळेच आरोग्य विम्याच्या पॉलिसी देताना या कंपन्या जास्तीत जास्त सावधानता बाळगतात. प्रत्येक व्यक्ती कंपनीकडे प्रपोजल फॉर्म जमा करत असतात. त्या अर्जाची छाननी करून, त्या अर्जामध्ये जास्त जोखीम आहे असे अर्ज बाजूला करतात. त्यांच्याकडून गरज भासल्यास आणखी काही रिपोर्ट मागविले जातात रिपोर्ट जमा केल्यानंतर सुद्धा त्या रिपोर्ट मध्ये काही जोखीम आहे असे आढळल्यास आरोग्य विमा देण्यास कंपनी नकार दर्शविते. व ज्यांच्या प्रपोजल फॉर्म मध्ये जोखीम नसते, अशा लोकांना विमा दिला जातो व त्यांच्याकडून हाफ्ताच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम एकत्र करून स्वतंत्र ठेवली जाते. व क्लेम आल्यावर या रक्कमेतून क्लेम दिला जातो, वर्षाअखेरीस क्लेम दिलेली रक्कम व जमा झालेली रक्कम वजा करून जी रक्कम शिल्लक राहते तो विमा कंपनीचा फायदा असतो.
आरोग्यविम्याची कार्यपद्धती समजून घेणे खूप गरजेचे आहे. अत्यंतिक प्रामाणिकपणा, परस्परांवर संपूर्ण विश्वास, कायम खरे बोलणे हे यशस्वी आरोग्यविम्यासाठी अतिशय आवश्यक आहे, आरोग्य- विम्याचे नियम, अटी, पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसी डॉक्युमेंट व्यवस्थित वाचून घ्यावे, कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, कोणत्या नाहीत समजून घेणे, कारण क्लेम झाल्यानंतर तो मिळण्यासाठी फारश्या अडचणी येत नाहीत.
प्रत्येक आरोग्यविम्याची कार्यपद्धती साधारण अशीच असते. कधीही पॉलिसी घेताना पॉलिसी नीट समजून घेणे. सर्व शंकांचे निरसन करून घेणे. सर्व शंकांचे उत्तर नीट मिळाल्यानंतर प्रपोजल फॉर्मवर सही करणे. कारण ही पॉलिसी आपल्याला हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर संपूर्ण आर्थिक भरपाई देणार असते. पॉलिसीचे सर्व नियम, अटी, संरचना नीट समजून घेतल्यास पुढे क्लेम मिळयास दिरंगाई होत नाही.
पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याकडचे पर्याय मर्यादित होतात. आणि पॉलिसी बदलण्यात आपलेच नुकसान होते. म्हणून पॉलिसी घेताना आरोग्य विम्याची कार्यपद्धती व रचना समजून घेणे आवश्यक असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा