आरोग्य - विम्याचे रिस्टोरेशन आणि त्यांचे फायदे
"आरोग्य - विम्याचे रिस्टोरेशन " आणि त्यांचे फायदे
आरोग्य - विम्यामध्ये रिस्टोरेशनचा फायदा कसा होतो ?
अप्रत्यक्षरीत्या येणारा हॉस्पिटलायझेशनचा खर्च आणि अचानक उद्भवणारे आजारपण यासाठी लागणारा हॉस्पिटल चा खर्च आरोग्य विमा पॉलिसी असेल तर त्या पॉलिसीमधून कव्हर केला जातो. पण नेहमी आपल्या काही लोकांत याची गंभीरता पहिली जात नाही. कारण नेहमी आपण आरोग्य विमा घेत असताना कमीत - कमी प्रिमियम (हप्ता ) असलेला आरोग्य विमा घेत असतो. यामुळे आरोग्य विमा पॉलिसी मध्ये आपण घेतलेली विमा - राशी व बोनस असल्यास पॉलिसीवर्षा मध्येच समाप्त झाली तर, व त्याच वर्षात पुन्हा हॉस्पिटल मध्ये ॲडमिट व्हावे लागल्यास किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यास अशा स्थितीत पॉलिसीधारकास पॉलिसी मध्ये असलेल्या इतर व्यक्तीस त्या पॉलिसी वर्षात इतर आजारांसाठी जोखीम घेऊन राहावे लागते.
पण रिस्टोरेशन बेनिफिट त्याच पॉलिसी वर्षात जेवढ आपला विमा असेल तेवढी विमा राशी पुर्नस्थापित होते व आपल्याला दावा करण्यास मदत होते.
उदा :-
श्री किशोर यांनी आपल्यासाठी एक आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली. समजा त्यांनी रु 5 लाख विमा रकमेची पॉलिसी खरेदी केली. व समजा श्री. किशोर यांना एका आजारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती व्हावे लागले. व त्यांच्या हॉस्पिटलायझेशनच्या CLAIM च्या खर्चात पूर्ण विमा राशी 5 लाख रुपये समाप्त झाली.
पण काही महिन्यांनी श्री किशोर यांना आणखी एका आजाराने ग्रस्त केले [त्याच पॉलिसी वर्षात ] व त्या आजारांच्या उपचारांसाठी ४ लाख रुपये इतक्या रकमेची गरज भासते. पण त्यांची मुळ विमा रक्कम समाप्त झालेली आहे, अशा स्थितीत १०० % रीस्टोरेशनची विमा राशी म्हणजे रु 5 लाख इतकी रक्कम अधिक केली जाते . त्याचा उपयोग त्याच आजरासंदर्भात किंवा इतर कोणत्याही आजारांसंदर्भात हॉस्पिटलायझेशन झाल्यास उपयोगात येतो.
रिस्टोरेशनच्या मुख्य गोष्टी काय आहेत?
1. रिस्टोरेशनची रक्कम आपली विमा राशी संपूर्ण समाप्त झाल्यानंतर हॉस्पिटलायझेशन व्हावे लागल्यास, एक आर्थिक मदत व एका रक्षक च्या स्वरुपात काम करते.
2. रिस्टोरेशन चा लाभ इंडीविज्युअल व फॅमिली फ्लोटर या दोन्ही पॉलिसीमध्ये उपलब्ध आहेत. नियम व अटीनुसार आपली विमा राशी व नो क्लेम बोनस शून्य झाल्यानंतर रिस्टोरेशन बेनिफिट कार्यरत होते.
3. रिस्टोरेशन बेनिफिट फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावते. इथे विमा राशी पूर्ण परिवारासाठी असते. आणि विमा राशी पूर्ण परिवारासाठी संपण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस रिस्टोरेशनचे बेनिफिट खूप महत्त्वाची भूमिका निभावते.
4. काही पॉलिसीमध्ये ज्या आजारांसाठी हॉस्पिटलायझेशन व्हावे लागते त्या आजारासंदर्भात पुन्हा दावा करावा लागल्यास सुद्धा रिस्टोरेशनचे बेनिफिट घेता येते.
टिप - रिस्टोरेशनचे बेनिफिट आपण घेतलेली विमा राशी पूर्ण संपल्यावर लागू होते. यासाठी जे उत्पादन आपण खरेदी करत आहोत. ते लक्षपूर्वक वाचणे खूप महत्त्वाचे आहे.
आपण इथे स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या उत्पादनांचे रिस्टोरेशन बेनिफिट खाली दिलेल्या तक्त्यानुसार पाहु.
स्टार
हेल्थ आरोग्य –
विमा पॉलिसी |
एका
पॉलिसीवर्षात मिळणारे रिस्टोरेशनचे फायदे टक्के वारीत |
स्टार
कॉम्र्प्रेहेन्सीव पॉलिसी |
100 % एक वेळा |
फॅमिली हेल्थ ऑप्टीमा |
100 % तीन वेळा |
मेडीक्लासिक पॉलिसी |
200 % एक वेळा |
यंग स्टार पॉलिसी |
100 % एक वेळा |
स्टार हेल्थ ॲशूर पॉलिसी |
100 % कितीही वेळा |
स्टार हेल्थ वुमेन
केअर पॉलिसी |
100 % एक वेळाझज |
आरोग्य - विमा पॉलिसी कॅशलेस व रिम्ब्रस्मेंट च्या माध्यमातून हॉस्पिटलायझेशन व्हावे लागल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी विमा - राशी प्रदान करते व आर्थिक मदत करते.
भारतीय बाजारपेठेत आरोग्य विमा निवडणे खूप कसरतीचे काम आहे. रिस्टोरेशन बेनिफिट एक फायदा आहे. जो योग्य आरोग्य विमा निवडण्यास आपली मदत करते.
प्रत्येक व्यक्तीस आरोग्य विमा आवश्यक आहे. आकस्मित येणाऱ्या सर्जरी , आजारपण याच्या मेडिकल खर्चासाठी संपूर्ण कव्हर आरोग्य विमा पॉलिसी देते. व आपण जेव्हा रिस्टोरेशन बेनिफिट सोबत आरोग्य - विमा पॉलिसी खरेदी करता. तेव्हा असलेली विमा राशी समाप्त जरी झाली तरी रिस्टोरेशन [Restoration] चा अतिरिक्त फायदा मिळतो व आपण भरलेल्या हफ्ता [Premium ] चा योग्य मोबदला आपल्याला मिळतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा