"नो क्लेम बोनस " No Claim Bonus


                                           'नो क्लेम बोनस'  No Claim Bonus 




  •   हेल्थ इन्शुरन्स मध्ये 'नो क्लेम बोनस'- 

            मिंत्रानो, आपण हेल्थ इन्शुरन्स खरेदी करायचा विचार  केलेला असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली पण असेल. पण, आपण पॉलिसी घेते वेळी एक विचार केला आहे का ? जर आपण पॉलिसी घेतली व कोणताही दावा नाही केल्यास आपण भरलेले पैसे फुकट जातात.

            आपण पॉलिसी घेतलेल्या  वर्षी क्लेम {दावा} नाही केल्यास कंपनी आपल्याला नो क्लेम बोनस  प्रदान करते. ह्या काही वर्षात सर्व आरोग्य-विमा कंपन्या आपल्या पॉलिसीधारकांना 'नो क्लेम बोनस' प्रदान करत आहे. सरळ भाषेत सांगायचे झाले तर, जर कोणी पॉलिसीधारक पॉलिसी वर्षात कोणत्याही क्लेम नाही करत त्या ग्राहकास आरोग्य-विमा कंपनी 'नो क्लेम बोनस' प्रदान करते. 

            पण काही कंपन्यांच्या विशिष्ठ पॉलिसीमध्ये पॉलिसी वर्षात पॉलिसीहोल्डरने क्लेम केला असेल तरी 'नो क्लेम बोनस' देत आहे. 

      उदा: स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी.

  • 'नो क्लेम बोनस' म्हणजे काय ?

            हेल्थ इन्शुरन्स मध्ये 'नो क्लेम बोनस' एक फायदा आहे. जो पोलिसी धारकांना क्लेम नाही केल्यास विमा रकमेमध्ये टक्केवारीच्या स्वरुपात अधिक होऊन मिळतो व त्याच प्रिमियममध्ये विमा रक्कम वाढविण्यास मदत मिळते जे पॉलिसी होल्डरला चांगले स्वास्थ राखुन ठेवण्यास प्रोत्साहन मिळते.

  • 'नो क्लेम बोनस' किती टक्के मिळतो?

            हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या प्रत्येक पॉलिसी प्रमाणे 'नो क्लेम बोनस' ठरलेला असतो. व तो टक्केवारीच्या स्वरुपात प्रदान केला जातो. हेल्थ इन्शुरन्स मध्ये 5% पासून 100 % पर्यंत 'नो क्लेम बोनस' दिला जातो. उदा : एका ग्राहकाकडे २० लाख विमा राशी असलेला आरोग्य विमा आहे आणि कंपनी प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी २५%   बोनस देत आहे. आणि मागील 5 वर्ष एकही क्लेम दावा केलेला नाही. तर खालील प्रमाणे 'नो क्लेम बोनस' काम करेल. 


वर्ष

'नो क्लेम बोनस'

विमा रक्कम

पहिले

-

20 लाख

दुसरे

रु 500000/-  लाख

25 लाख

तिसरे

रु 500000/-  लाख

30 लाख

चौथे

रु 500000/-  लाख

35 लाख

पाचवे

रु 500000/-  लाख

40 लाख


                वरील तक्त्याप्रमाणे [प्रत्येक दावा मुक्त वर्षानंतर विमा रक्कम वाढत जाते. हे त्या तक्त्यांवरून  स्पष्ट होते. याचा अर्थ असा कि, ग्राहकास चार वर्षानंतर क्लेम करण्याची आवश्यकता भासत असेल तर त्या ग्राहकास अधिक प्रिमियम न भारता 40 लाखापर्यंत दावा करता येऊ शकतो. 

टिप - काही कंपन्याकडे, काही पॉलिसीमध्ये दावा केला असेल तरी 'नो क्लेम बोनस' अधिक करून देत आहेत. 

  • क्लेम केल्यास 'नो क्लेम बोनस' मिळेल का? 

            काही हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या काही विशिष्ठ उत्पादनामध्ये जर [पॉलिसीवर्षात पॉलिसीहोल्डरने क्लेम केला असेल तर पुढच्या वर्षी 'नो क्लेम बोनस' अधिक केला जातो. व काही उत्पादनांमध्ये क्लेम केला असेल तरी 'नो क्लेम बोनस' वजा केला जात नाही.  

  • 'नो क्लेम  बोनस' सर्व पॉलिसीमध्ये मिळतो का ?

            सर्व आरोग्य विमा कंपन्या नो क्लेम बोनस प्रदान करतात. परंतु प्रत्येक विमा कंपनीच्या उत्पादनांवर अवलंबून आहे. 

            उदा - स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे सर्व प्रकारच्या सर्वांच्या वयानुसार आरोग्य विमा उत्पादनांची श्रुंखला आहे. ज्यामध्ये फॅमिली फ्लोटर इंडीविज्युअल  यामध्ये 'नो क्लेम बोनस' कंपनी देत आहे. आणि स्टार हेल्थ सिनिअर सिटीझन रेड कार्पेट या पॉलिसीमध्ये 'नो क्लेम बोनस 'प्रदान करत नाही आहे. 

            म्हणून कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी घेताना आरोग्य विमा पॉलिसीची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे.

               मित्रांनो आजच्या धकाधकीच्या जीवनात मेडिकलचा , हॉस्पिटलायझेशनचा  खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. म्हणून पॉलिसीमधील नो क्लेम बोनसचा फायदा एका आशिर्वादापेक्षा कमी नाही आहे. म्हणून स्वस्थ रहा, फिट रहा, आरोग्याची काळजी घ्या. आणि 'नो क्लेम बोनस' चा फायदा करून घ्या. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्टार हेल्थ इन्शुरन्स मराठी माहिती Star Health Insurance Information in Marathi

आरोग्य - विम्याची कार्यपद्धती

Co-Payment in Health Insurance (Marathi)