हेल्थ इन्शुरन्स रूम रेंट ! मराठी
हेल्थ इन्शुरन्स रूम रेंट ! मराठी
हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य -विमा ) मध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रूम रेंट. [खोली भाडे] . इलाज झाल्यावर जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जातो. त्यासोबत एक लांबसडक बिल सुद्धा दिले जाते. ह्या बिलामध्ये पेशंटच्या इलाजाच्या वेळी ज्या ज्या सेवा प्रदान केल्या जातात. त्या सर्व ह्या बिलामध्ये समाविष्ट असतात. ह्यामध्ये रूमचे भाडे सुद्धा समाविष्ट असते. आणि रूम भाडे पाहून नक्कीच आपल्या कपाळावर आटया येऊ शकतात. क्लेम करतेवेळी हॉस्पिटल रूम रेंट [खोली भाडे] सुद्धा कॅल्कुलेट करते. हे समजन थोड कठीण आहे पण आपण ह्या लेखात रुम रेंट कॅपिंग काय आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
हेल्थ इन्शुरन्स रूम रेंट कॅपिंग काय आहे?
रूम रेंट कॅपिंग म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यास आरोग्य -विमा कंपनीमार्फत ॲडमिट झालेल्या व्यक्तीस रूमचे भाडे सुद्धा देणे असते. जर कोणत्याही व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज भासते तर त्या व्यक्तिस बाकीच्या मेडिकल बिलासोबत रूमचे भाडे सुद्धा देणे बंधनकारक असते. पण रूमचे भाडे हे विमा रकमेच्या काही टक्क्यांवर अवलंबून असते.
कोणत्याही व्यक्तिने जर ३ लाख विमा राशी असलेला विमा घेतला असेल तर त्यास 1 % पर्यंत कव्हर दिले जाते. पण 5 लाख विमा रकमेच्या पुढे काही कंपन्याच्या उत्पादनामध्ये रूम रेंट कॅपिंग नाही आहे. मेडिकलचा खर्च पाहता काही कंपन्यांनी रूम रेंट कॅपिंग काढून सिंगल स्टँडर्ड, A/C रूम, व त्यापुढील कोणताही रूम घेतला असेल तर Any Room चे भाडे देत आहेत. फक्त विमा रकमेप्रमाणे रूम रेंट चे भाडे ठरविलेले आहे. त्यामुळे विमा पॉलिसी घेताना सर्व अटी शर्ती रूम रेंट रक्कम तपासून विमा घेणे.
हेल्थ इन्शुरन्स 'नो रूम रेंट' कॅपिंग काय आहे?
'नो रूम रेंट' कॅपिंग म्हणजे सरळ भाषेत सांगायचे झाले तर, खोली भाड्यासाठी कोणतेही मर्यादा नसणे. म्हणजे जेवढ्या लाखाचा विमा आहे तेवढ्या लाखापर्यंत रूम भाडे घेता येते.
म्हणजे आपण असे समजू शकता की, रूमचे भाडे 2००० रुपये असो किंवा 2०००० रुपये [प्रती दिवस] तुम्ही खोली भाड्याची चिंता न करता रूम सिलेक्ट करू शकता. फक्त खोली भाडे हे विमा रकमेच्या खाली असणे आवश्यक आहे.
रूम रेंट कॅपिंगचा आणखी एक प्रकार आहे. ज्यामध्ये विमा कंपनी स्पष्ट सांगते की, एका निश्चित रुमचेचं भाडे देय करेल. आपल्याला माहित आहेच कि, हॉस्पिटलचे रूम किती प्रकारचे असतात. जसे पर्सनल वार्ड तिथे एक व्यक्ती थांबू शकतो, सेमी शेअरिंग वार्डे जिथे दोन रुग्णांना थांबता येते. शेअरिंग वार्ड जिथे ४ ते ६ रुग्णांना भर्ती होता येते.
हेल्थ इन्शुरन्स मध्ये कॅपिंगची गरज आहे का?
पेशंटच्या काही टेस्ट करायच्या असल्यास पेशंटला एक दिवस अगोदर ॲडमिट होण्यास डॉक्टर सल्ला देऊ शकतात. कारण डॉक्टरांना सर्जरीच्या अगोदर काही टेस्ट करायच्या असतात. टेस्ट केल्यानंतर पेशंट सर्जरीसाठी तयार आहे कि नाही. त्याचे आरोग्य ठिक आहे का हे पडताळून पाहण्यासाठी एक दिवस अगोदर ॲडमिट होण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. आणि सर्जरी नंतर काही दिवस हॉस्पिटल मध्ये थांबण्याची आवश्यकता असते. जेणे करून पेशंटवरची निगराणी / लक्ष ठेवता येईल यानंतर पेशंट बरा झाल्यानंतर रूम रेंट [खोली भाडे] आणि त्या संबंधी असलेल्या सर्व मेडिकल बिले दिली जातात.
अशा वेळेस जर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने रूम रेंट कॅपिंग लावलेली असेल तर एक निश्चित रक्कम अदा केली जाईल. पण त्यांच्या विपरीत रूम रेंट कॅपिंग नसेल तर रूम रेंट बद्दल काही विचार करायची गरज नाही. कारण विमा कंपनी रूम रेंटची सर्व रक्कम अदा करेल म्हणून हेल्थ इन्शुरन्स घेताना कॅपिंग सारख्या नियमांचा अभ्यास करून घेणे.
ICU मध्ये भरती व्हावे लागल्यास काय होईल?
जर पेशंटला ICU मध्ये भरती करावे लागल्यास विमा कंपनी दुप्पट कव्हर देऊ शकते. जिथे रूमसाठी 1 % रूम रेंट [खोली भाडे] देत असेल तिथे ICU साठी दुप्पट किंवा यापेक्षा जास्त कवर देऊ शकते.
जर पॉलीसीमध्ये सांगितल्याप्रमाणे ICU साठी लागलेली रक्कम विमा रकमेपेक्षा जास्त असेल तर, पॉलिसी होल्डरला आपल्या खिशातून द्यावी लागेल.
पण जर आपण चांगला प्लॅन घेतला असेल व सर्व नियम अटी चांगल्याप्रकारे समजून घेऊन पॉलिसी घेतली असेल तर रूम रेंट व ICU चार्जेस Actual Cover करणारे उत्पादने काही आरोग्य विमा कंपनीकडे आहेत. जसे स्टार हेल्थ कंपनीच्या स्टार ॲशुअर प्लॅन मध्ये काही सम ॲशुअर च्या वर Any Room/ ICU चार्जस Actual [वास्तविक] म्हणजे कोणतीही मर्यादा नाही दिलेले आहेत.
हेल्थ इन्शुरन्समध्ये रूम रेंट चे इतके महत्त्व का आहे?
भारतात हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी खूप प्रकरचे रूम्स उपलब्ध आहेत. यामध्ये जनरल वार्ड, सेमी प्रायव्हेट (एसी, नॉन एसी) प्रावेट (एसी, नॉन एसी) डिलक्स रूम, सुपर डिलक्स, सूट रूम सामील आहेत. ह्या काही रूम्समध्ये फ्रीज, टिव्ही, एसी, सोफा, गिजर इत्यादी सुविधा असतात. जसे पैसे खर्च करायची तयारी असते. तसा रूम आपल्याला दिला जातो. या सुविधांच्या चक्रव्युवात आपले बिल वाढल जाते, व डिस्चार्ज वेळेस एक मोठ बिल आपल्या हातात दिल जात जर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर हे आपल्या खिशातून भरावे लागते. व हे आपलं आर्थिक बजेट बिघडवू शकते. त्यामुळे योग्य वेळी हेल्थ इन्शुरन्स [आरोग्य विमा] करून ठेवणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा